

Yavat social media post sparks Communal Tension
यवत: शुक्रवारी सकाळी यवत(ता.दौंड)मधील एका मुस्लिम व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर दुपारी बारानंतर यवतमधील आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे यवत मध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असून मस्जिदची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे यवत गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे 26 जुलै रोजी यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी झालेल्या या प्रकारामुळे यवत परिसरात तणावाचे वातावरण असून सोशल मीडियावर पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकार नगर भागात राहत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्याच्या घराची तोडफोड देखील केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी यवत भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Latest Pune News)
आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या सय्यद नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.