तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगांव दाभाडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री मारुती मंदिर चौकात रिक्षा स्टॅन्डच्या सदस्यांनी बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांना सावली, मिळावी निवारा मिळावा या हेतूने सुमारे आठ -दहा झाडे काही वर्षांपूर्वी लावली व त्यांची निगा राखून पाणी घालुन वाढवली. त्यातील तीन पूर्ण वाढ झालेली झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी कापून काढली आहेत. तळेगांव दाभाडे प्रशासकिय इमारतीच्या भिंती शेजारच्या या झाडांची नक्की कुणाला अडचण होती हे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.
सदर झाडे कोणी तोडली तोडण्याचे कारण काय समजणे आवश्यक आहे.
दिलीप डोळस,सामाजिक कार्यकर्ता तळेगाव दाभाडे
हेही वाचा