Malegaon Elections Result: माळेगाव कारखान्यात अजित पवारांचे सहा तर तावरेंचे चार उमेदवार आघाडीवर

दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू
Malegaon Elections Result
माळेगाव कारखान्यात अजित पवारांचे सहा तर तावरेंचे चार उमेदवार आघाडीवरPudhari
Published on
Updated on

शिवनगर: माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत पहाटे साडेचार वाजता संपलेल्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीच्या अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला अ वर्ग गटातून 16 जागांची आघाडी तर सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या 4 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड निश्चित आहे. (Latest Pune News)

Malegaon Elections Result
Pune Rain: शहरात दोन महिन्यांत तब्बल 511 मिलिमीटर पाऊस

माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार अनुक्रमे अनुसूचित जाती जमाती मधील रतनकुमार भोसले व भटक्या विमुक्त जाती जमातीतील विलास ऋषिकांत देवकाते तसेच ओबीसी प्रवर्गातील नितीन शेंडे हे आघाडीवर आहेत.

Malegaon Elections Result
Sassoon Hospital: 'ससून'ला अतिरिक्त खाटांच्या मंजुरीची प्रतीक्षा मनुष्यबळ अपुरे; रुग्णसेवा अडचणीत

दरम्यान पहिल्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत तर तावरे गुरु शिष्य यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत, यामध्ये सांगवी गटातून स्वतः चंद्रराव तावरे तसेच त्याच गटातून रणजीत खलाटे बारामती गटातून नेताजी गवारे आणि महिला राखीव गटातून राजश्री कोकरे आघाडीवर असल्याचे चित्र आहे,अद्याप दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून यामध्ये काही बदल घडतील का याची उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news