Sinhagad Fort completely closed

Sinhagad Fort Closed: पुणेकरांनो लक्ष असू द्या! सिंहगड किल्ला नागरिकांसाठी तीन दिवस बंद

Sinhagad Fort closed From 31 may to June 2 2025: दि. 31 मे ते 2 जून या कालावधीत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
Published on

Sinhagad Fort Closure Anti Encroachment

पुणे : सिंहगड किल्ल्यावर सध्या अतिक्रमण हटाव कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही अद्यापही सुरूच असल्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे दि. 31 मे ते 2 जून या कालावधीत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.

या काळात पायवाटांद्वारे गडावर येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे. गडावर जेसीबी किंवा अन्य मोठ्या वाहनांचा वापर शक्य नसल्यामुळे काही स्थायिक रेनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट बांधकामे पूर्णपणे हटवणे बाकी आहे. ही सर्व कामे हातानेच करावी लागत असल्यामुळे कार्यवाहीस अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून ही कार्यवाही लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news