Pune Ganesh Festival | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती जल्लोषात विराजमान

पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या आगमन मिरवणुकीला भाविकांची झालेली प्रचंड गर्दी.
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या आगमन मिरवणुकीला भाविकांची झालेली प्रचंड गर्दी.-
Published on
Updated on

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात 'श्री गणेश सुवर्णधाम मंदिरा’त विराजमान झाले. जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली.

मिरवणुकी दरम्यान इंद्रधनुष्यातील सप्तरंगाची उधळण आणि बुधवार चौकात सात थर रचून करण्यात आलेले बाप्पाचे जंगी स्वागत हे विशेष आकर्षण ठरले. या आगमन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार सकाळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन या दाम्पत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधिवत पूजा व आरती झाली. त्यानंतर आढाव बंधूचे नगारा वादन झाले. त्यानंतर आकर्षक फुलांनी व केळीच्या पानांच्या खुंटांनी सजवलेल्या पारंपरिक रथात मिरवणुकीला सुरुवात झाली.

रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास आगमन मिरवणूक श्री गणेश सुवर्णधाम मंदिरासमोर पोहोचल्यानंतर बाप्पांची मूर्ती अत्यंत देखण्या आणि सुशोभित मखरात विराजमान करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव स्वामी गोविंदगिरी महाराज, खासदार सुप्रिया सुळे आदींनी श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात येऊन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news