Shri Kasba Ganpati Temple Pune:श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली उलगडली; इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांचे व्याख्यान

यादव आणि शिवकाळीन शैलीतील कमानी, उलट नाग स्तंभ व स्वयंभू गणरायाची माहिती पुणेकरांसमोर
श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली उलगडली; इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांचे व्याख्यान
श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली उलगडली; इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांचे व्याख्यानPudhari
Published on
Updated on

पुणे : श्री कसबा गणपती मंदिराची रचना पाहिली, तर त्यात सभामंडप म्हणजेच अंतराळ आणि गर्भगृह आहे. शिवकालीन सभामंडप पूर्णपणे यादवकालीन शैलीत केलेले आहे. बाह्यभाग पूर्णपणे लाकडाचा आहे. मंदिरातील सुंदर कमानी पाहिल्या, तर त्यामध्ये केळ फुलाची मराठा शैलीतील कमान रेखीव कोरलेली दिसते. आतील भागात स्तंभांवर उलट नाग दिसतात आणि आत गणरायाची स्वयंभू मूर्ती पाहायला मिळते, अशी माहिती देत इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यानी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली पुणेकरांसमोर उलगडली.(Latest Pune News) ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दीपावली उत्सवाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले आहे

श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली उलगडली; इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांचे व्याख्यान
Lok Kalyan Bhushan Award Pune: सिंधूताईंचा वारसा ममताताईंनी जपला : महेश झगडे

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने दीपावली उत्सवाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आणि पुरातन मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा इतिहास याविषयावर अमोघ वैद्य यांचे व्याख्यान झाले.

वैद्य म्हणाले, मुरार जगदेवाने पुण्यावर आक्रमण केले आणि पुणे बेचिराख झाले. त्या वेळी पुण्याचे ग्रामदैवत उभे होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना ग्रामदेवतेने जणू बोलावले. यादव शैलीत त्यांनी मंदिर पुन्हा उभे केले. आताचा जो भाग आपल्याला दिसतो, तो पेशवेकाळात जोडला गेला.

श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली उलगडली; इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांचे व्याख्यान
Cockfight Gambling Raid: एम्प्रेस गार्डन परिसरात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगारबाजी; वानवडी पोलिसांची मोठी कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news