Shreya Hanchate Tooth Model : श्रेया हंचाटेची मोठी कामगिरी! दातांमधील कीड दाखवणाऱ्या ३डी मॉडेलला मिळाले भारत सरकारचे पेटंट

दातांमधील किडीची टप्प्याटप्प्याने होणारी वाढ अचूकपणे समजून घेण्यास होणार मदत
Shreya Hanchate Tooth Model
दंतवैद्यकीय विद्यार्थिनी श्रेया हंचाटे हिने दंत आरोग्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून डिझाइन पेटंट मिळवले आहे. Pudhari
Published on
Updated on

Shrivorian Carious Tooth Model

पुणे, पुढारी वृत्तसेवा : येथील भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील दंतवैद्यकीय विद्यार्थिनीने दंत आरोग्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून डिझाइन पेटंट मिळवले आहे. श्रेया हंचाटे असे तिचे नाव असून, तिने प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ सचिन पोतदार यांच्या मदतीने दातांमधील किडीची (caries) वाढ कशी होते? हे त्रिमितीय (3D) स्वरूपात दाखवणारे ‘श्रीयोव्हेरियन कॅरिअस टूथ मॉडेल’ (Shrivorian Carious tooth model) विकसित केले आहे. हे मॉडेल दंतवैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि डॉक्टरांना दातांचे इनॅमल (enamel), डेंटिन (dentin) आणि थेट पल्प (pulp) पर्यंत पोहोचणाऱ्या किडीची टप्प्याटप्प्याने होणारी वाढ अचूकपणे समजून घेण्यास मदत करणार आहे.

शैक्षणिक अनुभवातून सुचली नाविन्यपूर्ण कल्पना

या नाविन्यपूर्ण कल्पनेचा उगम श्रेयाच्या स्वतःच्या शैक्षणिक अनुभवातून झाला. श्रेया दंतवैद्यकीय अभ्‍यासक्रमाच्‍या दुसऱ्या वर्षात होती, तेव्हा विद्यार्थ्यांना दातांवर काम करण्यासाठी नेहमीचे घन ‘आयव्हेरियन’ टूथ मॉडेल्स दिले जायचे. त्यावर काम करताना दातांमधील किडीची केवळ कल्पना करण्यास सांगितले जायचे. मात्र, अशा मॉडेलवर किडीची कल्पना करून काम करणे अत्यंत कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी श्रेयाने प्रत्यक्ष कीड दाखवणारे मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला. दातांमधील किडीचे एकूण सहा प्रकार असतात आणि ते केवळ कल्पनेत आणण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे अभ्यासासाठी अधिक सोपे होईल, अशी खात्री तिला पटली.

Shreya Hanchate Tooth Model
POP Ganesha Idol Solution | 'नवीन मूर्तिकार घडले तरच पीओपीचा प्रश्न सुटेल'; पेडण्याचे मूर्तिकार सूर्यकांत पाडजींचा महत्त्वाचा सल्ला

३डी प्रिंटरच्या साहाय्याने मॉडेल्सची निर्मिती

ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रेयाने प्रयोगशाळेत ३डी प्रिंटरच्या साहाय्याने या मॉडेल्सची निर्मिती सुरू केली. यासाठी त्यांनी ‘डेंटल रेझिन’चा (dental resin) वापर करून दातांच्या वेगवेगळ्या किडींचे प्रकार हुबेहूब तयार केले आणि दातांमधील कीड खरीखुरी वाटावी यासाठी काळ्या रंगाचा वापर केला. अपेक्षित आणि परिपूर्ण मॉडेल तयार होईपर्यंत श्रेयाने सातत्याने याच्या परिणामांचा अभ्यास केला आणि त्यात आवश्यक ते बदल केले.

Shreya Hanchate Tooth Model
Blood Pressure: बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले! वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

मॉडेल रुग्णालय प्रशासनाने स्वीकारावे : श्रेया हंचाटे

हे मॉडेल किती प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी श्रेयाने सुरुवातीला ते तिच्या दोन मित्रांना वापरण्यासाठी दिले. त्यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक अभिप्रायानंतर तिने सहा महिन्यांपूर्वी डिझाइन पेटंटसाठी अर्ज केला होता, ज्याला अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे. नुकतीच आपल्या तिसऱ्या वर्षाची विद्यापीठीय परीक्षा दिलेल्या श्रेयाने या मॉडेलला ‘श्रीयोव्हेरियन’ (Shrivorian) असे नाव दिले आहे. हे नाव तिने स्वतःच्या नावातील पहिली तीन अक्षरे (Shr) आणि मूळ ‘आयव्हेरियन’ (ivorian) टूथ मॉडेलचा शब्द एकत्र करून तयार केले आहे. हे मॉडेल वापरणाऱ्या इतर १० विद्यार्थ्यांकडूनही श्रेयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, केवळ कल्पनेवर अवलंबून राहण्यापेक्षा या मॉडेलमुळे कीड नेमकी कशी वाढते हे दृश्य स्वरूपात समजणे अत्यंत सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता या मॉडेलचा अधिक व्यापक प्रमाणावर वापर करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने याचा स्वीकार करावा, अशी आशा श्रेयाने व्यक्त केली आहे.

Shreya Hanchate Tooth Model
दीर्घायुषी जपानी लोकांचा ‘असा’ असतो आहार…

‘श्रीयोव्हेरियन’ मॉडेल दंतवैद्यांसाठी एक प्रभावी साधन

दंतवैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्री-क्लिनिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेया हंचाटे हिचे हे संशोधन एक वरदान ठरणार आहे. रुग्णावर प्रत्यक्ष उपचार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हाताने सराव करण्याची संधी यामुळे मिळते. तसेच, क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या दातांची समस्या आणि त्यावर करायच्या उपचारांची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी (पेशंट कौन्सिलिंग) हे मॉडेल दंतवैद्यांसाठी एक प्रभावी साधन ठरत आहे. कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे आणि परीक्षांच्या तयारीसाठी देखील याचा मोठा उपयोग होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news