प्रणव शंकर लोंढे (वय 17, सध्या रा. अमृतनगर, मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. पारनेर, अहमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ मारुती लोंढे (वय 65, रा. मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. कान्हूरपठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून करणारी दोन्ही मुले 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील खून करणारा अल्पवयीन आणि प्रणव लोंढे हे एकमेकांचे मित्र होते. त्यांच्यात दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. त्याच भांडणाचा राग मनात धरून प्रणव यास सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चाकण-आंबेठाण रस्त्यावरील चाकण सौंदर्य सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत नेले.