

शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवित आहेत. परंतु, या आघाडीत शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी एकच जागा देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना (उबाठा) पक्षास फक्त एक जागा देण्यात आली आहे. पक्षाचे शहरप्रमुख संजय देशमुख यांना ही जागा देण्यात आली आहे. काँग्रेस आय पक्षाकडून प्रियांका ताई बंडगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांना प्रत्येकी एक जागा देऊन त्यांची बोळवण केल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख देशमुख यांनाच फक्त उमेदवारी भेटली आहे. इतर पदाधिकारी यांना जागा देण्यात आलेली नाही. जागा वाटपात डावलण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणने आहे.
शिरुर नगरपरिषदेत नगरसेवक पदाच्या 24 जागा आहेत. नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवित आहे. महाविकास आघाडीत केवळ एकच जागा घेण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची होती असे कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. या दोन्ही पक्षाची ताकद शिरूर शहरात कमी असल्यामुळे त्यांना कमी जागा मिळाल्याची चर्चा आहे.