Pune Airport : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, पुणे विमानतळाचे नाव बदलले!

पुणे विमानतळ 'जगदगुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे' या नावाने ओळखले जाणार
Pune airport name changed
पुणे विमानतळाचे नाव बदललेPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे विमानतळाबाबतीत शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला शिंदे सरकारने मंजुरी दिली आहे. आता पुण्याच्या लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी आज मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. Pune Airport

Pune Airport | वारकऱ्यांसाठी आनंददायी वातावरण

विमानतळाचे नाव बदलण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. वारकरी संप्रदायातील १७ व्या शतकातील मराठी संत तुकाराम महाराज यांच्या नावावरून विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला सोमवारी (दि.23) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. यासाठी एका पायाभरणी समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रस्ताव आणून मंजुरीसाठी पाठवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोहगाव विमानतळ हे जुने

पुणे विमानतळ लोहगाव विमानतळ म्हणूनही ओळखलेजाते. या निर्णयानंतर वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण असतानाच राजकीय जाणकार या निर्णयाला शिंदे सरकारचा मास्टर स्ट्रोक आणि महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी वारकरी व्होटबँकेला टॅप करण्यासाठी उचललेले उत्कृष्ट पाऊल असल्याचे सांगत आहेत. वारकरी समाजाच्या कार्यक्रमात पीएम मोदीही सहभागी झाले आहेत, त्यामुळे आगामी काळात हे नामकरणाचे राजकारण व्होट बँकेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला होता तो मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून आज मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news