Pune Land Scam | पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी विदेशात फरार ?

सर्वांनाच संशय; पोलिसांचा मात्र दुजोरा नाही
Pune Land Scam
Pune Land Scam | पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी विदेशात फरार ?
Published on
Updated on

पुणे : कोरेगाव पार्क आणि बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील शीतल किसनचंद तेजवानी विदेशात फरार झाल्याची चर्चा शनिवारी दिवसभर सुरू होती. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तेजवानी यांच्याविरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलिस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. नुकताच खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन्ही जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी सहभागी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन खरेदीखत करताना शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवानी, अमेडिया एंटरप्रायजेसचे संचालक दिग्विजय पाटील, सह-दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच, कृषी खात्याकडे बोपोडीतील पाच हेक्टर जमिनीचा ताबा असताना तहसीलदारांना हाताशी धरून जमिनीचा अपहार करून बेकायदा आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तहसीलदार सूर्यकांत येवले, अमेडियाचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यासह खडक पोलिस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत संशयित आरोपी शीतल तेजवानींनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते. अशातच आता तेजवानी फरार असल्याची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news