Maharashtra Political News: कृषिमंत्री रमी खेळतात, हे दुर्दैवी; शशिकांत शिंदे यांचा आरोप

कर्जबाजारी शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. असे असताना कृषिमंत्री मात्र सभागृहात रमी खेळत आहे.
Maharashtra Political News
कृषिमंत्री रमी खेळतात, हे दुर्दैवी; शशिकांत शिंदे यांचा आरोप Pudhari
Published on
Updated on

Allegation against agriculture minister for playing rummy

पुणे: राज्यात बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. कर्जबाजारी शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. असे असताना कृषिमंत्री मात्र सभागृहात रमी खेळत आहे. मंत्र्यांना रमी खेळायला वेळ आहे.

पण, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर त्यांना बोलायला वेळ नाही, यासारखे दुर्दैव नाही. सरकारची तिजोरी लुटून पाशवी बहुमताने सत्तेत आलेले हे सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. (Latest Pune News)

Maharashtra Political News
Purandar Ajit Pawar News|‘पुरंदर’च्या शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही: अजित पवार

प्रदेशाध्यक्षपदी व सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे व रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात आले म्हणून पक्षाच्या कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार बापू पठारे, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, तीन इंजिनचे सरकार असतांना या सरकारवर आठ महिन्यात मंत्रीमंडळ बदलण्याची वेळ येते यासारखे दुर्दैव नाही. राज्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. अर्थसंकल्प सादर केल्यावर तीन महिन्यात तब्बल 57 हजार कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची लाजिरवाणी वेळ सरकारवर आली.

Maharashtra Political News
Amruta Fadnavis: दुसऱ्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचे स्वातंत्र्य नाही; अमृता फडणवीसांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, कोर्टानं फटकारलं

अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री झोपले होते का ? राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. तब्बल साडे आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्यावर आहे. मात्र यांचे मंत्री सभागृहात शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले जात असताना विधानसभागृहात रमी खेळत बसतात. बील थकले म्हणून तरुण कंत्राटदार आत्महत्या करतो. तरीही सरकारला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. टोलवाटोलवी करतात. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही.

रोहित पवार म्हणाले, येत्या काही महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका लागणार आहे. या निवडणुका एकत्र येऊन लढाव्या लागणार आहेत. स्थानिक मुद्दे व सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्याला हाती घ्यावे लागणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्हाला साथ दिली. आता महानगरपालिका निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत लढणार आहोत.

सामाजिक कामांसाठी लढताना कोणीही त्रास देत असेल तर तिथे फक्त 24 तासांमध्ये पक्षाचा किमान एक नेता उपस्थित राहील, अशी रचना करणार आहोत. प्रामाणिक, तरुण कार्यकर्त्यांना नक्की उमेदवारी दिली जाईल. मतदान यंत्र मॅनेज करण्याचे नवे राजकारण यांनी सुरू केले आहे. त्यामुळे ही लढाई बूथवर आपण बारिक लक्ष ठेवण्यापासूनची आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news