शरद पवार- हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा, भेटीत नेमकं काय ठरलं?

Harshvardhan Patil meet Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याच्या तयारीत?
Harshvardhan Patil met Sharad Pawar
शरद पवार - हर्षवर्धन पाटील Pudhari
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणुकांच्या आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक जण प्रवेश करीत तुतारी हाती घेण्यास उत्सुक असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच मंगळवारी (दि. 27) मांजरीत भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. (Harshvardhan Patil meet Sharad Pawar)

मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच मंगळवारी या भेटीमुळे त्या शक्यतेला बळ मिळाले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? ते समजू शकले नाही.

विवेक कोल्हे यांचा पवारांच्या गाडीतून प्रवास

मांजरीतील वसंतदादा इन्स्टिट्यूटमधील बैठक पार पडल्यानंतर नगरमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी पवार यांनी त्यांना आपल्या गाडीतून प्रवास करण्याची सूचना केली. त्यामुळे मांजरीतून त्यांनी शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केला. मांजरीत पवार यांच्या गाडीत बसण्याच्या वेळी काँग्रेसचे युवानेते आमदार विश्वजित कदम हेही उपस्थित होते.

पुण्यातील मांजरीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, माढ्याचे आमदार बबन शिंदे, राजेश टोपे, अहमदनगरचे विवेक कोल्हे आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, इंदापूर विधानसभा निवडणूक भाजपकडून लढविण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. मात्र, जेथे ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाला तिकीट मिळणार असल्याचे महायुतीचे सूत्र आहे. त्यामुळे आता भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने ते अस्वस्थ आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news