

बारामती: सोमवारी (दि. ६) दिल्लीत बारामती विधानसभा पोट निवडणूकीबाबत वेगळे वक्तव्य केलेल्या ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी गुरुवारी (दि. ९) बारामतीत काॅंग्रेसने विचारले तर ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल असा सल्ला देईल असे विधान केले. अर्थात या बाबतचा निर्णय काॅंग्रेसने घ्यायचा आहे असे ते म्हणाले.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बारामतीत काॅग्रेसने लढायचे ठरवले असल्याचे दिसते आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा अपघाताने रिक्त झाली आहे. अजित पवार यांच्या रुपाने एक कर्तृत्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला आहे. मला विचारला तर मी निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहिल, असा काॅंग्रेसला सल्ला देईल पण निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असे शरद पवार म्हणाले.