‘व्हीएसआय’च्या व्यासपीठावर काका- पुतणे येणार एकत्र

विविध पुरस्कारांचे उद्या वितरण
Ajit pawar, sharad pawar
‘व्हीएसआय’च्या व्यासपीठावर काका- पुतणे येणार एकत्रfile photo
Published on
Updated on

पुणे: ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ची (व्हीएसआय) 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ येत्या गुरुवारी (दि.23) होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. दरम्यान, वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासह अन्य पुरस्कार जाहीर केले आहेत.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती व्हीएसआयचे उपाध्यक्ष, विश्वस्त दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सभेमध्ये सभासद कारखान्यांना आणि विभागवार जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना ऊसभूषण, राज्यस्तरीय ऊसभूषण, साखर कारखान्यातील आणि संस्थेमधील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना वैयक्तिक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊसविकास आणि संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन, नावीन्यपूर्ण आणि तांत्रिकद़ृष्ट्या सर्वोत्तम कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजक कारखाना यांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

सन 2023-24 वर्षामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण सहा शेतकर्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 13 सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साखर कारखान्यांतील अधिकार्‍यांना वैयक्तिक सात बक्षिसे तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाच वैयक्तिक बक्षिसे या वेळी देण्यात येतील, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्कृष्ट साखर कारखाना

कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार अहिल्यानगर येथील अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड (अंबिकानगर) यांना जाहीर झाला आहे. दोन लाख 51 हजार रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता’ पुरस्कार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आहे.

अन्य पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार : दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (आलेगाव, ता. दौंड, जि. पुणे)

  • सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : सोमेश्वर साखर कारखाना (सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे)

  • सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना (कागल, जि. कोल्हापूर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news