

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 12 ऑगस्टला जाहीर करण्यात आले. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल, तर दहावीच्या परीक्षेसाठी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
बारावी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
दहावी परीक्षा : 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025