

पुणे : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार पं. उल्हास कशाळकर, पं. तेजेंद्र नारायण मजुमदार, पद्मा देशपांडे, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे या दिग्गजांचे सादरीकरण अन् तब्बल 17 कलाकारांचे प्रथमच महोत्सवात सादरीकरण... अशी सुरेल पर्वणी पुणेकर रसिकांना‘71 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त अनुभवायला मिळणार आहे. संगीताच्या विश्वात नावाजलेल्या या महोत्सवाचा स्वरयज्ञ 10 ते 14 डिसेंबर या कालावधीत दरम्यान रंगणार आहे. महोत्सवात यावर्षी निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच आपली कला या स्वरमंचावर सादर करतील.
लोकेश आनंद. डॉ. चेतना पाठक, शुभेंद्र राव, सास्कीया राव -दे-हास, ॠषिकेश बडवे, इंद्रायुध मजुमदार, जॉर्ज ब्रूक्स, पं. कृष्णमोहन भट, सत्येंद्र सोलंकी, सिद्धार्थ बेलमण्णू, अनुराधा कुबेर, पं. रूपक कुलकर्णी, डॉ. भरत बलवल्ली, मेघरंजनी मेधी, श्रुती मराठे, अनिरुद्ध ऐताळ, डॉ. एल शंकर.
माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरू केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदाही दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे. विशेष म्हणजे एकूण कलाकारांच्या संख्येच्या निम्म्याहून अधिक कलाकार हे पहिल्यांदाच महोत्सवात आपली कला सादर करतील.
श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ