Lifetime Achievement Awards 2026 | सतीश आळेकर, मेधा पाटकर यांना जीवनगौरव

जावेद अख्तर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती जीवन साधना पुरस्कार
Lifetime Achievement Awards 2026 |
Lifetime Achievement Awards 2026 | सतीश आळेकर, मेधा पाटकर यांना जीवनगौरव
Published on: 
Updated on: 

पुणे : अमेरिकेतील सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या पुरस्कारांचे यंदाचे अंतिम वर्ष असणार आहे, अशी माहिती महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) संस्था आणि साधना ट्रस्टच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दीपक पवार यांना साहित्य विशेष, तर शारदा साठे यांना समाजकार्य जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या 'पीळ' या कादंबरीला ललित ग्रंथ, तर लोकेश शेवडे यांच्या 'शहाणा असशील तर लिहू नकोस' पुस्तकाला वैचारिक/अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार देण्यात येईल. गिरीश दातार व अपूर्वा कुलकर्णी यांच्या 'सवाल जबाब' या नाटकाला रा. शं. दातार नाट्यलेखन, तर छाया खोब्रागडे यांना सामाजिक कार्यकर्ता (संघर्ष), रुकसाना मुल्ला यांना सामाजिक कार्यकर्ता (प्रबोधन) आणि सियाराम पाडवी यांना युवा कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.