Satej Patil Women Reservation Statement: महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रयत्न; सतेज पाटील यांचा आरोप

२०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्याची मागणी; पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरूनही सरकारवर टीका
Satej Patil
Satej PatilPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून देशातील राजकीय गणित बदलण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) करून त्यांची संख्या वाढवण्याचा सरकारचा डाव आहे. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध नसून, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.

Satej Patil
Maharashtra Excise Department Services: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १३४ सेवा आता ९८ वर; परवाना प्रक्रिया होणार सुलभ

डिलिमिटेशनच्या माध्यमातून संविधानात बदल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Satej Patil
Pune Koyta Crime: पुण्यात कोयत्याने होणाऱ्या गुन्ह्यांत ६५ टक्क्यांनी घट; पोलिस आयुक्तांची माहिती

पाटील म्हणाले, २०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले गेले, तेव्हा काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. महिला आरक्षण लागू झाले पाहिजे, ही पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी का केली नाही? आता २०२९ पासून आरक्षण लागू करण्याची संधी असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Satej Patil
Purandar Youth Addiction: पुरंदर तालुक्यात तरुणाई व्यसनांच्या विळख्यात; वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींची चिंता

३० तारखेला याबाबत काय निर्णय होतो, हे स्पष्ट होईल; मात्र या प्रक्रियेमागील राजकीय हेतू जनतेच्या लक्षात आला आहे. दरम्यान, महागाईमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले असून, २०२९ नंतर भाजप नको, असा जनतेचा निर्धार असल्याचा दावाही पाटील यांनी केला.

Satej Patil
Ambegaon Potato Prices: बटाट्याचे बाजारभाव घसरले; आंबेगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

शहरातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली; सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे. अमली पदार्थांचा विळखा वाढत असून, यासाठी गृहमंत्री जबाबदार असल्याची टीका करत त्यांनी महाराष्ट्राला पूर्णवेळ स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज असल्याचे मत व्‍यक्त केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा केवळ जयघोष करून उपयोग नाही. भिडेवाड्याच्या कामासाठी मिळालेला निधी आणि प्रत्यक्ष खर्च पाहता सरकारची अनास्था स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.