सरपंच पत्नीच्या नावे लाच घेणार्‍या पतीसह, दुसर्‍या सरपंचाला बेड्या

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Pune Crime News
सरपंच पत्नीच्या नावे लाच घेणार्‍या पतीसह, दुसर्‍या सरपंचाला बेड्याfile photo
Published on
Updated on

पुणे: पूर्वीच्या मालकाचे नाव नमुना 8 उतार्‍यावरून काढून टाकून तो उतारा तक्रारदाराच्या नावे करून देण्यासाठी 16 हजारांची लाच घेणार्‍या मौजे वरघड ग्रामपंचायतीची महिला सरपंचाच्या पतीला व लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या गिवशी आंबेगावच्या सरपंचाला 16 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटच्या समोरच्या बाजूस असलेल्या अतुल्य हॉटेलच्या पार्किंगमध्ये करण्यात आली.

वरघड ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचचाचा पती नथुराम कोंडीबा डोईफोडे (वय 32, रा. रायकरमळा, धायरी गाव) आणि वेल्हातील गिवशी आंबेगावचा सरपंच बाळासाहेब धाबू मरगळे (वय 33, किरकटवाडी, हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार यांनी नुकताच वेल्ह्यातील वरघड गावात जमीन खरेदी केली होती. जमिनीच्या पूर्वीच्या मालकाच्या नावे असलेल्या घराच्या गाव नमुना 8 उतार्‍यावरील पूर्वीच्या मालकाचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराने या ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.

त्या अनुषंगाने वरघड गावची सरपंच महिला सुवर्णा नथुराम डोईफोडे व त्यांचे पती आरोपी नथुराम हे त्यांना भेटले. तक्रारदारांच्या कामासाठी व तसा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यासाठी महिला सरपंच व तिच्या पतीने तक्रारदारांकडे 18 हजारांची लाचेची मागणी केली. मात्र लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली.

त्यानंतर सापळा रचला गेला त्यामध्ये सरपंचाचा पती नथुराम जाळ्यात अडकला तसेच त्याला प्रोत्साहन देणारा गिवशी गावचा सरपंच बाळासाहेब मरगळे हा देखील गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news