Mahalakshmi Temple Pune: मंत्रोच्चार, पाद्यपूजन अन् औक्षण सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन उत्साहात

बाल शिशू मंदिर आणि समर्थ विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींचा सहभाग; देवीच्या स्तोत्रांनी मंदिर परिसर दुमदुमला
Mahalakshmi Temple Pune
Mahalakshmi Temple PunePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: 'या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता... नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः...' या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात बाल शिशू मंदिर आणि समर्थ विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील १०८ मुलींच्या 'कन्यापूजन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Mahalakshmi Temple Pune
Smita Jadhav: अमरीश पुरी, निळू फुलेंच्या आवाजातून डॉ. स्मिताताई जाधव यांना मतदानाचे आवाहन

या वेळी अभिनेत्री पूजा पवार, अपूर्वा सपकाळ, मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त आणि उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त प्रवीण चोरबेले उपस्थित होते. कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन आणि औक्षण करण्यात आले. सुगंधित अत्तरपाणी मुलींवर शिंपडून त्यांचे पाद्यपूजन देखील करण्यात आले, तसेच ट्रस्टतर्फे सर्व मुलींना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या.

महिलांसाठी आजपासून आरोग्य तपासणी शिबिर

श्री महालक्ष्मी मंदिर आणि हरजीवन हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार (दि. १६) ते मंगळवार (दि. २०) या कालावधीत सारसबागसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे होणार आहे. शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांसह मंदिराचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Mahalakshmi Temple Pune
Pune Election Voting Leave: पदवीधर, शिक्षक मतदारांना २३ ऑक्टोबरला विशेष रजा; खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना दोन तासांची सवलत

शिबिरात नाडी, रक्तदाब, श्वसन दर, शरीराचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करा तपासण्यात येणार आहे. तसेच, सीबीसी, थायरॉईड कार्यक्षमता, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी १२ या रक्त तपासण्यांची सुविधाही उपलब्ध असेल. तसेच, महिलांसाठी रविवारी (दि. १८) मॅमोग्राफी, तर शनिवारी (दि. १७) आणि रविवारी (दि. १८) हाडांच्या घनतेची तपासणी करण्यात येणार आहे.

यासोबतच शुक्रवार (दि. १६) ते सोमवार (दि.१९) रक्तदान शिबिराचेही आयोजन केले आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी ७५१७५६९९२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news