

इंदापूर: पुणे जिल्हा परिषदेचे माजी सागर मल्हारी भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ३५ वर्षाचे होते. भोसले हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून सणसर-लासुर्णे गटातून २०१७ ते २०२२ पर्यंत व सध्या काळजीवाहू सदस्य म्हणून कार्यरत होते.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनलमधून तत्कालीन काँग्रेस आय पक्षातून त्यांनी ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी युवकांमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला होता. त्यांच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या गटासह इतरही परिसरामध्ये विकास कामे केली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. (Latest Pune News)