

रामदास डोंबे
खोर: जिल्ह्यासह राज्यातील ग््राामीण भागात एक सामाजिक परिवर्तन झपाट्याने आकार घेत आहे, ते म्हणजे लव्ह मॅरेजची वाढती संस्कृती. ज्या समाजात एकेकाळी प्रेमविवाह म्हणजे गुन्हा, बंड किंवा कुटुंबावरील कलंक मानला जात होता, त्या समाजात आज हे विवाह धाडसातून पुढे येऊन हळूहळू स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. बदलाची गती अशी की, अनेक गावांमध्ये गेल्या 5 वर्षांत अशा विवाहांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त वाढल्याचे स्थानिक जाणकार सांगतात.
ग््राामीण युवक-युवती शहरात शिक्षणासाठी जाणे, कॉलेजमधील खुले वातावरण, मोबाईल-सोशल मीडिया यांच्या माध्यमातून वाढणारी संवाद क्षमता या सगळ्यामुळे ओळखी वाढत आहेत. मोबाईल हा या बदलाचा सर्वात मोठा मटर्निंग पॉइंटफ ठरला आहे. मलव्ह मॅरेज म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा निर्णय नसून, ग््राामीण समाजात समतेच्या दिशेने उचललेले मोठे पाऊलफ असे होत आहे. विविध जाती-धर्मातील तरुणांनी प्रेमविवाह केल्यामुळे सामाजिक स्तर, भेदभाव आणि जुनाट परंपरांच्या भिंती कमी होत असल्याचेही दिसू लागले आहे.
दरम्यान याबाबत यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, आमच्याकडे महिन्यात जवळपास 10 तरी अशा लव्ह मॅरेज पद्धतीने लग्न करून जोड्या येत असतात. वयाच्या 18 पासून ते 21 वयापर्यंत ही मुले-मुली लग्न करून पोलिस ठाण्यात थेट दाखल होतात. आमच्याकडे समुपदेशन कक्ष आहे. या वेळी आम्ही या जोडप्याला आणि मुलांच्या आई-वडिलांना समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून व्यवस्थित समजावून सांगतो; मात्र हे होत असताना समाजात सामाजिक अभिसरण होणे आवश्यक व स्वाभाविक आहे. बर्याचदा संकुचित दृष्टिकोनातून, कमी वयातील उथळ प्रेम किंवा सोशल मीडियाच्या प्रभावाखाली वाहून जाऊन केलेले विवाह बहुतांशी अपयशी ठरून अल्पकाली ठरतात. उदात्त हेतूशिवाय केलेले प्रेम टिकाऊ ठरत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन थेट विवाहाचा निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. प्रेमात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विश्वास. विवाह हा आयुष्यभराचा विषय असून, नात्यात एकमेकांवर विश्वास व परस्पर समर्पण असणे अत्यावश्यक आहे.
बदलामागे असलेले काही गंभीर दुष्परिणाम
मोबाईलमुळे चुकीच्या नात्यांमध्ये गुंतलेले तरुण.
अल्पवयीनांचे पळून जाण्याचे वाढते प्रकार.
तडकाफडकी केलेले विवाह.
आर्थिक स्थैर्य नसताना घेतलेले निर्णय.
एखादवेळी घेतला जातो चुकीचा निर्णय
लव्ह मॅरेज करताना वर सांगितलेल्या गंभीर दुष्पपरिणामामुळे अनेक कुटुंबात दुरावा, तणाव, कोर्ट आणि पोलिस ठाण्याची दारे ठोठवण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी अशा विवाहांमुळे दोन्ही कुटुंबांतील नातेसंबंध कायमचे तुटतात, तर काही ठिकाणी जातीय तणावही निर्माण होतो. ग््राामीण भागातील वाढती मलव्ह मॅरेजफ संस्कृती ही केवळ विवाहपद्धतीचा बदल नसून, समाजाच्या पुढील पिढीची मानसिकता, स्वातंत्र्य आणि समानतेचा संकेत देणारा मोठा सामाजिक क्रांतिकाळ ठरू लागला आहे.
मी वयाच्या 75 वर्षांत आजपर्यंत 175 लग्न जमविले आहेत. याकामी मी एक रुपया कोणाचा घेतला नाही. स्वतःच्या गाडीने जाऊन स्थळ दाखवत आहे. हल्ली मुलींचे आई-वडील फार पुढे गेली आहेत. आम्हाला जावई हा नोकरी करणारा, घरी गाडी, बंगला असणारा पाहिजे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मुलींच्या घरच्यांची मानसिकता बदलली असल्याने मुलांची लग्ने रखडली गेली आहेत. त्यामुळे आजकालची मुले-मुली ही लव्ह मॅरेजकडे वळली आहेत.
राजाराम दत्तोबा बोत्रे, वधू-वर सूचक, पारगाव, ता. दौंड
मी आपल्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये समजूत, प्रेम आणि विश्वास होता; मात्र लग्नाचा निर्णय घेताच अडचणींची मालिका सुरू झाली. सुरुवातीला मुलीकडील कुटुंबीयांचा विरोध ही माझ्या समोरील पहिली आणि मोठी अडचण ठरली. मुलीकडील कुटुंबाचा पाठिंबा नसल्याने लग्नाची तयारी, राहणीमान आणि भविष्यातील जबाबदाऱ्या स्वतःच्या जोरावर पेलाव्या लागल्या. या सर्व अडचणींवर मात करत विवाह यशस्वी केला. आज माझ्या आयुष्यात स्थैर्य आहे. वेळेनुसार मुलीकडील कुटुंबीयांचाही विरोध कमी होत गेला आणि संवादातून नाती पुन्हा जुळून आली. आता आमचा सुखाने संसार सुरू आहे
मंगेश कर्वे, लव्ह मॅरेज विवाहित, वाळकी, ता. दौंड