

पुणे: रुबी हॉल क्लिनिक हिंजवडीच्या स्त्री रोग व प्रसूतीच्या विभागाने नुकतीच एक गुंतागुंतीची व उच्च जोखमीची प्रसूती स्थिती हाताळत अशा प्रकारची आव्हानात्मक स्थिती हाताळण्याचे रुग्णालयाचे कौशल्य दर्शविले. एक ३५ वर्षीय महिला दुसऱ्या प्रसूतीदरम्यान ३५ व्या आठवडयात पॉलीहायड्रॅमनिऑस (अतिरिक्त ऍम्नीऑटिक द्रव्य - अर्भकाला संरक्षण देणारे पिवळे द्रव्य) आणि अचानक द्रव्याचा स्त्राव सुरु झाल्याची समस्या घेऊन रुग्णालयात आली होती.
तिला २१ डिसेंबर २०२४ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तातडीने २४ डिसेंबर २०२४ रोजी सी-सेक्शन प्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या तत्पर आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे माता आणि बाळ हे दोन्ही स्थिर असून बरे आहेत. रुग्णाची स्थिती आणि ज्या परिस्थितीत त्या रूग्णालयात दाखल झाल्या, त्यामुळे ही स्थिती विशेष करून गुंतागुंतीची होती.
दाखल झाल्यानंतर रुग्णाला गर्भाशयाच्या आकुंचनामुळे तीव्र वेदना होत होत्या आणि त्या घाबरल्या असल्याने प्रारंभी तपासणी कठीण होत होती. या परिस्थितीमध्ये त्वरित अल्ट्रासाउंड चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये बाळाचे डोके खाली असण्यापेक्षा वर होते (ब्रीच पोझिशन). त्यामुळे प्रसूतीसाठी ही अत्यंत जोखमीची स्थिती होती.
याशिवाय सी- सेक्शन प्रक्रियेदरम्यान आणखी आव्हाने समोर आली. बाळाची नाळ नैसर्गिकरित्या वेगळी झाली नसल्याने त्याला काढून टाकावी लागली. गर्भाशयाच्या पोकळीची तपासणी केल्यावर सबसेप्टेट स्थितीचे निदान झाले. (दुर्मिळ जन्मजात दोष ज्यामध्ये गर्भाशयाचे अंशतः स्नायूच्या भिंतीने विभाजन होते ).
त्याशिवाय नाळ गर्भाशयाच्या अविकसित भागात स्थित होती, ज्यामुळे ही स्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आणि यामुळे माता आणि नवजात शिशुसाठी अधिक जोखीमकारक होती. याबरोबरच पॉलीहायड्रॅमनिऑस स्थितीमुळे अचानक ऍम्नीऑटिक द्रव्याचा स्त्राव व्हायला लागला.
ही सर्व आव्हाने असली तरी रुबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय टीमने उत्कृष्ट सहयोग आणि कौशल्य दर्शविले. आउट पेशंट विभागाच्या टीमने बाळाची स्थिती जाणून घेण्यासाठी कठीण परिस्थितीत देखील नॉन स्ट्रेस टेस्ट (एनएसटी) ची चाचणी केली. इमर्जन्सी विभागाने रुग्णाला स्थिर ठेवण्यात यश मिळविले तर रेडिओलॉजी विभागाने महत्वाच्या निदान चाचण्यांनी यामध्ये सहयोग केला.
डॉ. आभा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शल्यचिकित्सा कक्षामधील टीमने अचूकतेने तातडीची सी-सेक्शन प्रक्रिया केली आणि मातेने २.२ किलो वजनाच्या मुदतपूर्व मुलीला जन्म दिला. बालरोग तज्ञ डॉ. श्रद्धा पाटील यांनी त्वरित बाळाची काळजी घेण्यासाठी एनआयसीयु मध्ये दाखल करत उपचार सुरु केले.
रुबी हॉल क्लिनिक हिंजवडीच्या येथील वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. आभा भालेराव म्हणाल्या की, या परिस्थितीतील यशस्वी व्यवस्थापन हे अखंड सांघिक कार्य आणि जलद निर्णय घेण्याच्या क्षमतेचे महत्व अधोरेखित करते. आउट पेशंट विभागाच्या तत्पर प्रतिसादापासून ते शल्यचिकित्सा टीमची अचूकता आणि नवजात बाल चिकित्सा विभागातील उपचार अशा प्रत्येक टप्प्यात माता आणि बाळ यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वानी महत्वाची भूमिका बजावली. यातील यशस्वी परिणाम हे रुग्णसेवेतील उत्कृष्टतेसाठी रुबी हॉल क्लिनिकची वचनबद्धता दर्शविते.
रुबी हॉल क्लिनिक हिंजवडीचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुधीर राय यांनी उत्कृष्ट सांघिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, सर्वात गुंतागुंतीच्या आणि गंभीर स्थितीतही उच्च दर्जाचे उपचार प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या उच्च जोखीम असलेल्या प्रसुतीचे व्यवस्थापन हे आमच्या वैद्यकीय टीमच्या समर्पणाचे कौशल्याचे आणि सहयोगी भावनेचे योग्य उदाहरण आहे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा फायदा रुग्णांना मिळावा हे आमचे ध्येय अशा परिणामांमधून अधोरेखित होते.
डॉ. भालेराव यांनी सिझेरियन सेक्शन प्रक्रियेत मदत करणाऱ्या डॉ. स्वरदा कुलकर्णी, डॉ. नीता बोंडे, इमर्जन्सी कक्ष कर्मचारी, रेडिओलॉजी टीम आणि ऑपरेशन थिएटर कर्मचारी यांचे आभार मानले.या आव्हानात्मक प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात या सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हे उल्लेखनीय यश सर्वात गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीत ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करण्याचे रुबी हॉल क्लिनिकचे समर्पण दर्शविते. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, अत्यंत कुशल टीम आणि रुग्णांना प्राधान्य देण्यात दृष्टिकोन यांचा मेळ घालून प्रसूती आणि स्त्री रोग शास्त्राच्या क्षेत्रात रुबी हॉल क्लिनिक नवे मापदंड स्थापित करत आहे. ज्यामुळे माता आणि बालकांसाठी चांगले परिणाम दिसून येत आहेत.