ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह केस: पोर्शे प्रकरणातील डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करा

पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पत्र
Pune News
ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह केस: पोर्शे प्रकरणातील डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द कराFile Photo
Published on
Updated on

पुणे: पार्शे कार अपघात प्रकरणात रक्त नमुने अदलाबदलीच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेले ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, असे पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठवले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांसह डॉक्टरांनीही आरोपीला मदत केल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत दोघे डॉक्टर, शिपाई यांना अटक करण्यात आली होती.

अल्पवयीन कारचालकाच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचे रक्त तपासणीसाठी घेतले होते. या प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. मागील दहा महिन्यांपासून दोघेही डॉक्टर तुरुंगात आहेत. या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पत्राद्वारे केली आहे.

‘त्या’ पोलिस अधिकार्‍यांचा बडतर्फीचा प्रस्ताव

याच प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलिस अधिकार्‍यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे. येरवडा पोलिस ठाण्यात हे दोन अधिकारी त्या वेळी कार्यरत होते.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून या दोघांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. त्यानुसार त्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news