‘नेट’चा निकाल जाहीर; पाच हजार 158 उमेदवार सहायक प्राध्यापकासाठी पात्र

निकाल एनटीएची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in वर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे
UGC NET Result
‘नेट’चा निकाल जाहीर; पाच हजार 158 उमेदवार सहायक प्राध्यापकासाठी पात्रPudhari
Published on
Updated on

पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएकडून यूजीसी नेटचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल एनटीएची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in वर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार यूजीसी नेट स्कोअर कार्ड देखील डाऊनलोड करू शकतात. यूजीसी नेट परीक्षेअंतर्गत उमेदवारांना तीन श्रेणींमध्ये पात्रता मिळाली आहे.

डिसेंबर सत्रात 5 हजार 158 उमेदवार सहायक प्राध्यापकासाठी, 48 हजार 161 सहायक प्राध्यापक आणि पीएच.डी. प्रवेशासाठी आणि 1 लाख 14 हजार 445 उमेदवार केवळ पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. नेट परीक्षेसाठी यंदा नोंदणीकृत उमेदवारांची संख्या 8 लाख 49 हजार 166 होती. यापैकी 6 लाख 49 हजार 490 उमेदवारांनी संबंधित परीक्षा दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय आणि विद्यापीठांसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापकपदी नोकरी मिळविण्यासाठी तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी यूजीसी नेट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे देशभरातील पात्र उमेदवार संबंधित परीक्षा देत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news