महिला भव्य बाईक रॅलीसाठीच्या नोंदणीला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: बाईक रॅलीची यशस्वी दोन वर्षे... महिला अन् तरुणींचा भरघोस प्रतिसाद... पारंपरिक वेशभूषेत महिलांचा बाईक रायडिंगचा आनंद अन् सामाजिक संदेश असे समीकरण... यंदा तिसर्याही वर्षी महिला-तरुणींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पुढारी’ माध्यम समूह आणि ‘पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे आयोजित महिलांची भव्य बाईक रॅली निघणार असून, रॅलीसाठी शेकडो महिला-तरुणींनी नावनोंदणी केली आहे. महिला-तरुणींमध्ये बाईक रॅलीसाठी कमालीचा उत्साह अन् उत्सुकता पाहायला मिळत असून, नावनोंदणीला त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
रविवारी (दि. 23 मार्च) रॅलीचे आयोजन केले असून, दरवर्षी मोठ्या जोशात अन् जल्लोषात निघणार्या या रॅलीत महिला-तरुणींना सहभागी होण्याची संधी असून, अधिकाधिक महिला-तरुणींनी रॅलीसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या रॅलीतून पाणीबचतीसह पाण्याच्या वापरासंदर्भात काही महत्त्वपूर्ण संदेशही दिले जाणार आहेत.
पुण्यात ‘पुढारी’ माध्यम समूह आणि ‘पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे आयोजित महिलांच्या भव्य बाईक रॅलीने वेगळाच नावलौकिक मिळविला आहे. या रॅलीत महिला-तरुणी आत्मविश्वासाने बाईक चालवतात आणि त्याद्वारे सामाजिक संदेशही देतात. यंदाचे रॅलीचे तिसरे वर्ष असून, रॅलीच्या नावनोंदणीला महिला-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त ही रॅली आयोजित केली असून, त्याद्वारे ‘पाणी हेच जीवन’ असा महत्त्वाचा संदेश दिला जाणार आहे.
गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या प्रारंभानिमित्त ही बाईक रॅली होणार असून, पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नगर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतून 23 मार्च रोजी एकाच दिवशी ही रॅली आयोजित केली आहे. पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील पुढारी भवन येथून सकाळी साडेसात वाजता बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे.
रॅलीसाठी पारंपरिक वेशभूषा, पांढरा कुर्ता-जीन्स, लाल ओढणी हा ड्रेसकोड असणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड हे रॅलीचे फायनान्स पार्टनर आहेत; तर अमेय गटणे, गायत्री गटणे यांचे एथेक्स हॉलिडेज हे ट्रॅव्हल पार्टनर तसेच मोहन यमजाल यांचे कलांजली सिल्क अॅण्ड सारीज् हे गिफ्ट पार्टनर आहेत.
येथे साधावा संपर्क
रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे आणि नोंदणी करणे आवश्यक आहे. बातमीत दिलेल्या स्कॅनरवर स्कॅन केल्यानंतर लिंक उघडेल. या लिंकवर आपण नोंदणी करू शकता. या भव्य रॅलीत शहरातील महिला आणि महिलांसाठी काम करणार्या संस्थांनी ग्रुपने सहभागी व्हावे. सहभागी होण्यासाठी 7040848572 किंवा 7972252835 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
