

पुणे : पुणे एअर अॅक्शन हबने महापालिका प्रशासनाकडे कचरा जाळण्याच्या तक्रारींचे निवारण सुधारण्याची मागणी करणारी तक्रार केली आहे.अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज मीना यांना कचरा जाळण्याच्या तक्रारींचे निवारण अधिक चांगल्या प्रकारे कशी करावी याच्या उपायोजना देत सुमारे तेराशे नागरिकांची स्वाक्षरी असणारी तक्रार केली आहे.
पुणे अॅक्शन हबने वर्षभर अभ्यास करुन महापालिकेला शहरातील सर्वंच भागात कचऱ्याची समस्या कशी बिकट बनली आहे. याचा लेखा जोखा दिला आहे. यात म्हटले आहे की,कचरा जाळण्याच्या तक्रारींना तातडीचा प्रतिसाद मिळत नाही. आग विझल्यानंतर खूप उशिरा प्रतिसाद मिळतो, ज्यामुळे कोणत्याही प्रतिबंधात्मक कारवाईची व्याप्ती कमी होते. तक्रारी करण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध असली तरी या तक्रारींचे वेळेवर आणि समाधानकारक निराकरण झालेले दिसून आलेले नाही.
कचरा जाळण्याच्या सततच्या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकेला युध्द पातळीवर प्रयत्न वाढवावे लागतील. अलीकडेच मोबाईल पथके सुरू करण्यात आली आहेत, परंतु त्यांच्या कामगिरीतही काही तृटी आहेत.त्यासाठी आम्ही हा तक्रार अर्ज केला आहे.
श्वेता वेर्णेकर,सदस्य परिसर,संस्था
अॅक्शन हबने केलेल्या मागण्या..
कचरा जाळण्यासाठी 247 समर्पित तक्रार क्रमांक हवा
तक्रार दाखल झाल्यानंतर त्वरित कारवाईसाठी प्रतिसाद पथके द्या
केलेल्या तक्रारींचे थेट ट्रॅकिंग, मोबाईल पथकांचे स्थान मिळावे
कचरा टाकणे,जाळणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाईट राऊंडला परवानगी
जाळण्याच्या आणि डंपिंगच्या ठिकाणांचे वॉर्डनिहाय मॅपिंग
वॉर्ड पातळीवर मासिक आधारावर जाळण्याच्या आणि डंपिंग कमी करण्यासाठी केलेल्या कृतींच खुलासा करणे