Rain Alert: आज, उद्या कोकणला ‘रेड अलर्ट’; मध्य महाराष्ट्र, विदर्भाला मुसळधारेचा इशारा
पुणे: रविवारी आणि सोमवारी कोकणला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून त्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाला दोन दिवस ऑरेंज अलर्ट (मुसळधार) देण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात मान्सून हळूहळू सक्रिय होत असून रविवारी तो विदर्भ आणि गुजरातकडे निघेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर 20 जूनपर्यंत राहणार आहे. कोकणात रविवारी आणि सोमवारी (दि. 15 व 16 जून) अतिमुसळधारेचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. याच दोन दिवसांत मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधारेचा (ऑरेंज अलर्ट) अंदाज देण्यात आला आहे. (Latest Pune News)
असे आहेत अलर्ट (कंसात जूनमधील तारीख)
रेड अलर्ट (अतिमुसळधार): कोकण: (15,16) (रत्नागिरी, सिंधुदुर्ग).
ऑरेंज अलर्ट (मुसळधार): मध्य, उत्तर महाराष्ट्र: (15,16) (पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा).
यलो अलर्ट (मध्यम): विदर्भ (15 ते 18).
ग्रीन अलर्ट (हलका): मराठवाडा (15 ते 20).

