गणेश खळदकर
पारंपरिक शिक्षणातून रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा कौशल्यशिक्षण तसेच तंत्रशिक्षणाकडे वाढत चालला आहे. परिणामी तंत्रशिक्षणाची रिकामी राहणारी बाके भरू लागली असून, यंदा तब्बल 84 टक्के जागावंर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे संगणकासंदर्भातील विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असून संगणक अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागांपैकी तब्बल 92 टक्के जागांवर प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचा टक्का चांगलाच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा राज्यात एकूण सुमारे 400 हून अधिक असलेल्या पॉलिटेक्निक संस्थामध्ये 1 लाख 14 हजार 27 इतकी प्रवेश क्षमता होती. तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत असल्याने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यंदाही या अभ्यासक्रमांना पसंती दर्शवल्याचे दिसत आहे. तब्बल 95 हजार 248 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
गत वर्षीच्या तुलनेत ही संख्या नऊ हजारांनी जास्त आहे. गेल्या काही वर्षातील ही प्रवेशाची रेकॉर्डब—ेक आकडेवारी आहे. यामध्ये सर्वाधिक 31 हजार 411 विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी आणि डेटा सायन्स आदी अभ्यासक्रमांना घेतला आहे. या अभ्यासक्रमांसाठी 34 हजार 221 जागा उपलब्ध होत्या. त्याशिवाय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या दोन विषयांनाही यंदा कल अधिक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सर्वात कमी म्हणजे एकूण असलेल्या जागापैकी 74 टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. राज्यातील पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील तीन वर्षांपासून चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे. यंदा राज्यात एकूण सुमारे 400 हून अधिक असलेल्या पॉलिटेक्निक संस्थामध्ये 1 लाख 14 हजार 27 इतकी प्रवेश क्षमता होती. तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत असल्याने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यंदाही या अभ्यासक्रमांना पसंती दर्शवल्याचे दिसत आहे. तब्बल 95 हजार 248 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.