Rave Party: रेव्ह पार्टी की ड्रग पार्टी? तरुणाईसाठी झिंग नव्हे जाळं

रेव्ह पार्टी हा शब्द पाश्चिमात्य देशांतून भारतात आला. या पार्टीमध्ये ट्रान्स म्युझिक, डीजे, रंगीत लाइट्स, नृत्य आणि खुले वातावरण असते.
Pune News
रेव्ह पार्टी की ड्रग पार्टी? तरुणाईसाठी झिंग नव्हे जाळंFile Photo
Published on
Updated on

पुणे: रेव्ह पार्टीबाबत अनेकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. संगीत, मद्याची झिंग आणि नृत्य अशी रेव्हची एक बाजू असते. परंतु, ज्या वेळी अशा पार्ट्यांचे आयोजन ड्रग (अमली पदार्थ) सेवनासाठी होते, तेव्हा ती ड्रग पार्टी बनते.

दरम्यान, रविवारी पहाटे खराडीतील स्टेबर्ड हॉटेलमध्ये पोलिसांनी कारवाई केली, त्या वेळी पार्टीत कोकेन हा अमली पदार्थ पोलिसांना मिळून आला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने रेव्ह पार्टी की ड्रग पार्टी, अशी चर्चा रंगू लागली. अखेर पोलिसांनी ती ड्रग पार्टी असल्याचे शिक्कामोर्तब केले. (Latest Pune News)

Pune News
Nag Panchami 2025: नागपंचमीसाठी दगडी नागोबा देवस्थान सज्ज; 200 वर्षांची परंपरा

पुण्यात 4 मार्च 2007 ला सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे गावात एका शेतात रेव्ह पार्टी झाली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने छापा टाकून ही पार्टी उद्धवस्त केली होती. या वेळी तब्बल 289 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

प्रयोगशाळेत सर्वांची तपासणी केली असता, त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, चंडीगढ, ठाण्यासह पुणे शहरातील विद्यार्थी, आयटी, व्यावसायिक, हवाईसुंदरी, खासगी कंपन्यातील बड्या अधिकार्‍यांची मुले पार्टीत सहभागी झाली होती. विदेशी नागरिकदेखील सहभागी झाले होते. या वेळी घटनास्थळावर गांजा, चरस व अमली पदार्थाच्या कॅप्सूल व पावडर मिळून आली होती.

राज्यातील बहुधा ही पहिलीच रेव्ह पार्टी असावी. त्याच वेळी प्रशासकीय यंत्रणांना कळले असावे की, अशा प्रकारची रेव्ह पार्टी असते. त्यानंतरदेखील अलीकडेच 2013 मध्ये पवना धरणाजवळील आपटी गेवंडे येथे सुरू असलेल्या पार्टीवर पहाटेच्या वेळी छापा टाकून बारबालांसह 40 युवकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये अनेक जण बाहेरच्या राज्यासह मुंबईतील होते. अशा मोठ्या पार्टीत ड्रग मिळू लागल्याने मागील काही वर्षांत पोलिस यंत्रणा अलर्ट झाल्या.

त्यामुळे या पार्ट्यांची जागा फार्म हाउस, बंदिस्त खोल्यांनी घेतली. शहरालगतच्या फार्म हाउसपासून शहरातील पार्ट्यांसाठी भाड्याने मिळणार्‍या सदनिकांपासून, हॉटेलच्या खोल्यांनी घेतली. रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय? रेव्ह पार्टी हा शब्द पाश्चिमात्य देशांतून भारतात आला. या पार्टीमध्ये ट्रान्स म्युझिक, डीजे, रंगीत लाइट्स, नृत्य आणि खुले वातावरण असते.

Pune News
Karegaon News: कारेगाव येथे शेततळ्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अनेक वेळा फार्म हाउस, रिसॉर्ट्स, जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यांवर या पार्ट्या आयोजित केल्या जातात. रेव्ह पार्टीचा उद्देश मैत्री, आनंद आणि संगीताचा उत्सव असतो. परवानगी घेऊन, कायद्याच्या चौकटीत राहून अशा पार्टी केल्यास तो गुन्हा होत नाही. मात्र, अमली पदार्थांचा वापर, अल्पवयीन मुलांचा सहभाग, मद्यधुंद अवस्था यामुळे त्यांचं स्वरूप विकृत झालं आहे. इथूनच मरेव्ह पार्टीफ आणि मड्रग पार्टीफ त्यामुळे गर्दीची असणारी रेव्ह पार्टी ठरावीक जणांना बंद खोलीत एकत्र करून ड्रग पार्टीचे स्वरूप घेत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

ड्रग पार्टी? ड्रग पार्टी म्हणजे रात्रभर फक्त ड्रग्सचे सेवन होत राहते. एमडी, एलएसडी, चरस, कोकेन यांसारख्या अत्यंत घातक अमली पदार्थांचं सेवन ड्रग पार्टीत केले जाते. अनेकदा हे ड्रग चॉकलेटमध्ये, गोळ्यांमध्ये, हुक्कामध्ये मिसळूनही घेतले जाते. अशा पार्टींमध्ये सहभागी तरुण अनेकदा शारीरिक, मानसिक आणि कायदेशीर अडचणीत अडकतात. अनेक वेळा ड्रग्ज मिळवण्यासाठी तरुण चोरी, ब्लॅकमेलिंग, सायबर गुन्हे तसेच गंभीर गुन्हे करतात.

त्यामुळे ड्रग पार्टी मौजमजा नसून गुन्हेगारीची सुरुवात असते, असे पोलिस सांगतात. रेव्ह पार्टीचा उद्देश हा संगीत, नृत्य व मैत्री यापुरता असतो. यामध्ये जेव्हा ड्रगचा वापर होतो तेव्हा ही पार्टी बेकायदेशीर ठरते. तर ड्रग पार्टीमध्ये पूर्णपणे ड्रगचा वापर हा बेकायदेशीरपणे केला जातो. रेव्हसाठी परवानगी घेतल्यास ती कायदेशीर ठरते. मात्र, यामध्ये ड्रग आणि इतर अमली पदार्थांचा उपयोग करणे मान्य नसते. तर ड्रग पार्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात.

रेव्ह पार्टी समजून ड्रग पार्टी टाळा, रेव्ह पार्टीला सामाजिक आणि सांस्कृतिक रूप देता येते, पण त्या पार्टीला कायदेशीर चौकटीत ठेवावे लागते. ड्रग पार्टी ही समाजासाठी विष आहे. त्यामुळे तरुणांनी फक्त मौजमजेच्या नावाखाली अंधपणे धावू नये आणि समाजानेही रेव्ह आणि ड्रग पार्टी यातील फरक ओळखून सजग राहण्याची गरज आहे. एखाद्या चुकीच्या पावलामुळे तुमचे आयुष्य खराब होऊ शकते.

- अजय दुधाणे, अध्यक्ष, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news