शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आळेफाटा चौकात रास्ता रोको आंदोलन

महामार्ग रद्द न झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घरासमोर सनदशीर मार्गाने उपोषण करण्याचा इशारा
Alephata News
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आळेफाटा चौकात रास्ता रोको आंदोलनPudhari
Published on
Updated on

आळेफाटा: पुणे-नाशिक द्रुतगती औद्योगिक महामार्ग क्रमांक 11 रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आळेफाटा (ता. जुन्नर) चौकात सोमवारी (दि. ७) सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्ग रद्द न झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घरासमोर सनदशीर मार्गाने उपोषण करण्याचा इशारा यावेळेस संघर्ष समिती प्रमुख बाळासाहेब औटी यांनी यावेळेस दिला.प्रस्तावित पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द करावा यासाठी शेतकरी संघर्ष समितीने यापुर्वी राजुरी येथे साखळी उपोषण यासह इतर आंदोलने केली आहेत.

हा महामार्ग रद्द करावा यासाठी आळेफाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रथम शिवाजी महाराजांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळेस शेतकरी संघर्ष समिती प्रमुख बाळासाहेब औटी, सहप्रमुख वल्लभ शेळके, समन्वयक जी. के. औटी, एम. डी. घंगाळे, मोहन नायकवडी, ज्ञानेश्वर शेळके, माजी सभापती दीपक औटी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, किशोर डोके, गणेश गुंजाळ यांचेसह जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व संगमनेर तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.

मोहन नायकवडी यांनी प्रास्ताविक केले.यानंतर आळेफाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. होता. यावेळी बोलताना बाळासाहेब औटी म्हणाले की, या महामार्गासाठी या पाच तालुक्यांतील सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार असून यामधील जवळपास बाराशे हेक्टर क्षेत्र बागायती आहे.

याचा सर्वे मार्च 24 रोजी ड्रोनच्या साह्याने करण्यात आला व त्यानंतर बाधित शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या. पुणे-नाशिक महामार्ग असताना अस्तित्वात असताना राज्य सरकारचा हा नवीन प्रस्तावित महामार्ग करण्याचा डाव कदापीही संघर्ष समिती पूर्ण होऊ देणार नाही. तसेच वेळ पडल्यास यासाठी रक्त सांडण्याचा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

विवेक शेळके यांनी सांगितले की हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी वेगवेगळ्या मार्गाने संघर्ष केले आहेत. त्यानंतरही हा निर्णय रद्द होण्याचा निर्णय झाला नाही. पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

माजी सभापती दीपक औटी यांनीही यावेळेस बोलताना यापूर्वीही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. अनिल नागरे, उमेश कामठे, गणेश गुंजाळ यांची यावेळेस भाषणे झाली. यानंतर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे जुन्नर नायब तहसीलदार अनंत गवारी यांना हा मार्ग रद्द व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

घोषणांनी चौक दुमदुमला

शेतकरी एकजूटीचा विजय असो, एकच जिद्द महामार्ग बंद, पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 11 रद्द करा या शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी आळेफाटा चौक दुमदुमला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news