Rajshree Munde Accident | धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाट्यावर घटना
Rajshree Munde Accident
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघातfile photo
Published on
Updated on

उरुळीकांचन : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना गुरूवारी (दि.१७) पहाटे घडली. मुंडे यांच्या लॅन्ड क्रुझर कारने ट्रॅव्हल्स बसला पाठिमागून जोरदार धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे या सुखरुप असून त्या दुसऱ्या वाहनाने पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या आपल्या लॅन्ड क्रुझर कारने पुण्याच्या दिशेने जात होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाट्याजवळील घुले पेट्रोल पंपासमोरुन जाणाऱ्या ट्रव्हल्स बस गाडीचा अंदाज न आल्याने मुंडे यांची लॅन्ड क्रूझर कार बसला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की, लॅन्ड क्रुझर कार महामार्ग सोडून रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. सुदैवाने गाडी पलटी न झाल्याने राजश्री मुंडे व चालक सुखरुप आहेत. त्यानंतर मुंडे या खासगी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघून गेल्या आहेत. या अपघातात त्या सुखरूप असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

महामार्गावर बेकायदा पार्किंग सर्रास!

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय भयानक आहे. या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठे दुर्लक्ष केल्याने रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेक वर्षे आहे. या ठिकाणी शहरीकरण झाले असताना महामार्गावर पथदिवे, इतर सुविधा व रस्त्याचा दर्जा चांगला देणे क्रमप्राप्त आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे. तर महामार्गावर बेकायदेशीरपणे वाहने उभी केल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news