शिरूर खरेदी-विक्री संघ सभापतिपदी राजेंद्र नरवडे; उपसभापतिपदी बाळासाहेब नागवडे

दोघेही सलग तिसर्‍यांदा खरेदी-विक्री संघावर निवडून आले आहेत.
Shirur News
शिरूर खरेदी-विक्री संघ सभापतिपदी राजेंद्र नरवडे; उपसभापतिपदी बाळासाहेब नागवडेPudhari
Published on
Updated on

शिरूर: शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेंद्र उत्तमराव नरवडे सभापतिपदी, तर उपसभापतिपदी बाळासाहेब अर्जुनराव नागवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील पंचवार्षिकमध्ये हे दोघे सभापती, उपसभापती होते. दोघेही सलग तिसर्‍यांदा खरेदी-विक्री संघावर निवडून आले आहेत.

सोमवारी (दि.24) खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. त्यात या निवडणुकीसाठीचे पक्ष निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पुणे जिल्हाध्यक्ष अण्णा महाडिक यांनी नरवडे व नागवडे यांची नावे जाहीर केल्यानंतर या दोघांनी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्याकडे अर्ज दाखल केले, दोन्ही पदांसाठी एक एकच अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

सतरा संचालकांच्या जागा असलेल्या खरेदी-विक्री संघामध्ये बारा जागा या बिनविरोध झाल्या होत्या, तर पाच जागेवर झालेल्या निवडणुकीत पाच ही जागेवर माजी आमदार अशोक पवार यांचे समर्थक निवडून आले होते, तर बिनविरोध आलेले बारापैकी दहा संचालक हे आमदार माऊली कटके म्हणजेच महायुतीचे समर्थक होते.

सभापती, उपसभापती कोण निवडून येणार यावर चर्चा सुरू असतानाच माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून निवडून आलेल्या पाचपैकी तीन संचालकांनी नरवडे, नागवडे यांना पाठिंबा दिला, तर बाळासाहेब नागवडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर अशोक पवार यांचे कट्टर समर्थक सभापती झालेले राजेंद्र नरवडे यांनी निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. या निवडणुकीसाठी सर्व सतरा संचालक उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचूंदकर, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल ढमढेरे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, माजी युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, निखिल तांबे, बाजार समितीचे माजी सदस्य आबाराजे मांढरे, सुधीर फराटे, श्रीनिवास घाडगे, विश्वास कोहकडे, कुंडलीक शितोळे, अमोल वर्पे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा श्रुतिका झांबरे, युवक महिला अध्यक्षा तज्ञिका कर्डिले आदी उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्याची आतषबाजी करत गुलाल उधळत विजय साजरा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news