Alandi: राजा-प्रधान, आमदार-मल्हार ओढणार माऊलींचा रथ; पालखी बैलजोडीचा मान घुंडरे घराण्याला

सावकार-संग्राम आणि माउली-शंभू देणार अधिकची सेवा
Ashadhi Wari 2025
राजा-प्रधान, आमदार-मल्हार ओढणार माऊलींचा रथ; पालखी बैलजोडीचा मान घुंडरे घराण्यालाPudhari
Published on
Updated on

आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला आहे. घुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे. विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे यंदाच्या माउलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत.

विवेक घुंडरे यांनी बावधन (जि. सातारा) येथून राजा-प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे. तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे. (Latest Pune News)

Ashadhi Wari 2025
Pune Accidents: पुणे-मुंबई महामार्ग ठरतोय ‘मृत्युमार्ग’; दरवर्षी ऐंशीहून अधिक वाहनचालकांचा अपघाती मृत्यू

अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी, पुणे येथून 5 लाख 51 हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली, तसेच दुसरी बैलजोडी माऊली व शंभू ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी केला आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत, बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबर्‍याचा भुगा, बैलखाद्य मिक्स आदी देत आहेत.

Ashadhi Wari 2025
Market Update: टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, शेवगा महाग; अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर

आळंदी येथे आज मिरवणूक

बैलजोडीची सोमवारी(दि. 2) आळंदी शहरात भव्य मिरवणूक व पूजन होणार आहे. जास्तीत जास्त आळंदीकर, तसेच भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मानकरी घुंडरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news