

Maharashtra Monsoon Update Today
पुणे: अवघ्या बारा तासांत राज्यातील वातावरण पूर्ण बददले असून, कमाल तापमानाचा पारा 42 अंशावरून थेट 30 ते 32 अंशावर खाली आला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान लोणावळा 19.9,महाबळेश्वर 24 तर पुणे शहरात 32.8 अंश तापमानाची नोंद झाली. बंगालचा उपसागर अन अरबी समुद्रातून आलेल्या बाष्पयुक्त वार्यांनी ही कमाल केली आहे. गुरुवारीदेखील राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली.
दिवसभर गार वारे वाहत असल्याने सरासरी कमाल तापमानाचा पारा 42 वरून थेट 30 ते 32 अंशावर खाली आला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळी हवेचा आनंद नागरिकांनी लूटला. राज्यात सर्वात कमी कमाल तापमान लोणावळा येथे 19.9 अंश इतके नोंदले गेले. त्या पाठोपाठ महाबळेश्वर येथे 24 तर पुणे शहराचे तापमान 32.8 अंशावर खाली आले होते. (Latest Pune News)
तापमानात मोठी घट
राज्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कमाल तापमानात 8 ते 10 अंशांनी घट झाली आहे. दिवसभर गार वारे सुटल्याने नागरिकांची असह्य उकाड्यातून सूटका झाली.
या ठिकाणी ’यलो अलर्ट’ (कंसात तारीख)
पुणे (9 ते 12),धुळे (9), जळगाव (9 ते 12),अहिल्यानगर (9 ते 12), कोल्हापूर (9 ते 12), सातारा( 10 ते 12), छ. संभाजीनगर (9 ते 11), अकोला (10 ते 12), भंडारा (10 ते 12), बुलडाणा (11,12), चंद्रपूर (9 ते 12), गडचिरोली (9 ते 12), गोंदिया (10,11), नागपूर (9 ते 11), वर्धा 9 ते 11), वाशिम (11,12), यवतमाळ (11,12)
राज्यात 24 तासांत झालेला पाऊस (मी.मी मध्ये)
मुंबई (18.5), रायगड (13.5), लोणावळा (3.5), कर्जंत (2.5), पुणे (गिरीवन 2.5,लवासा 4,तळेगाव 3.5,माळीन 7.5), निमगिरी 10.5) नाशिक 18.