पुणे पुढारी वृत्तसेवा: राज्यातील नऊ जिल्ह्यांना शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तीन जिल्ह्यांत शनिवारपर्यंत पाऊस राहणार आहे. मात्र उर्वरित भागात ढगाळ अन् कोरडे वातावरण राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे कमालीचा उकाडा जाणवत आहे. पाऊस पडेल असे वाटत असताना गुरुवारी पाऊस झाला नाही.
रायगड (31), रत्नागिरी (31, 1, 2), सिंधुदुर्ग (31, 1, 2), पुणे (31), कोल्हापूर (31 व 1), सातारा (31 व 1), सांगली (31), लातूर (31 व 1), धाराशिव (31).