

पुणे: पुढारी वृत्तसेवा : राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत असून 15 ऑगस्टपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पावसाला सुरुवात होत आहे. (Maharashtra Rain Alert)
हवामान विभागाने 18 ऑगस्टपासून पाऊस सक्रिय होणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. मात्र, त्याआधीच पाऊस सक्रिय होत आहे. आज 15 ऑगस्टरोजी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथे अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातही आगामी तीन दिवस म्हणजे 15 ते 18 ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)