

पुणे: राज्यात मंगळवार (दि. 5) पर्यंत पावसाचा खंड राहणार आहे. कडक ऊन आणि कोरडे वातावरण राज्यात सर्वत्र दिसेल. मात्र, बुधवार (दि. 6) पासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस सुरू होत आहे. त्या भागात 6 ते 8 ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. (Latest Pune News)
उत्तर भारतात पावसाचे धूमशान सुरूच असून, राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, राज्यात हवेचे दाब कमी झाल्याने 5 ऑगस्टपर्यंत पाऊस कमी झाला आहे. मात्र, 6 पासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागांत पाऊस वाढत आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.