Maharashtra Rain Alert | राज्‍यात ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात चक्रीवादाळाच्या निर्मितीला सुरुवात
Maharashtra Rain Alert |
Maharashtra Rain Alert | राज्‍यात ऐन दिवाळीत पावसाची शक्यता
Published on: 
Updated on: 

पुणे : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. शनिवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. रविवारी, २५ रोजी त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांत तर सोमवारी चक्रीवादळात रुपांतर होऊन ते तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे येईल. त्यानंतर २५ ते २९ ऑक्टोबर असा चार दिवस त्याचा प्रभाव राहणार आहे. तसेच अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मात्र येथे चक्रीवादळाची निर्मिती होण्यास आणखी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे तूर्तास महाराष्ट्रावर या वादळाचा मोठा परिणाम होणार नाही. मात्र दिवाळीत राज्यात पाऊस पडू शकेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

पूर्व मध्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन शनिवारी कमी दाबाच्या क्षेत्रात' रूपांतरित झाले. रविवारी त्याचे अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात आणि सोमवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबर रोजी ते आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराच्या भागात पोहोचेल. त्यामुळे दक्षिण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तुर्तास पाउस नाही

या स्थितीचा महाराष्ट्रावर सध्या तरी काही परिणाम दिसणार नाही. दक्षिण किनारपट्टीला रेड अलर्ट देण्यात आला असून तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्यास सात दिवसांचा अवकाश असून १ ते २ नोव्हेंबर दरम्यान म्हणजेच ऐन दिवाळीच्या सुमारास राज्यात पावसाची शक्यता आहे.

नेमकी स्थिती काय?

आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप बेटांवर कमी दाबाचे क्षेत्र तयार ­

पूर्व मध्य, आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप, मालदीव, कोमोरिन, कन्याकुमारीनजीक समुद्राच्या परिसरात विखुरलेले दाट, कमी व मध्यम उंचीचे ढग आहेत.

यामध्ये तीव्र ते अतितीव्र संवहन प्रक्रिया सक्रिय होती. नैऋत्य अरबी समुद्रातही विखुरलेले कमी, मध्यम उंचीचे ढग होते, ज्यामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचे संवहन दिसून आले. अरबी समुद्रात पुढील पाच ते सात दिवसांत चक्रीवादळ निर्मितीची शक्यता आहे.

'मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन' (एमजेओ) ही हवामान प्रणाली सध्या तिसऱ्या टप्प्यात असून त्याचे आयाम १ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे दक्षिण भारतात अतिवृष्टीची शक्यता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news