

Monsoon update Maharashtra
पुणे: मध्य महाराष्ट्र आणि कोकणात शुक्रवार आणि शनिवार असे दोनच दिवस तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र 11 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारी पाऊस झाला. तसेच शुक्रवारी व शनिवारी याच ठिकाणी तुरळक भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र पावसाचा जोर जास्त असून 8 ते 11 ऑगस्टदरम्यान या भागात यलो अलर्टचा इशारा सर्वंच जिल्ह्यांना देण्यात आला आहे. (Latest Pune News)