Faster Train Ticket Booking | रेल्‍वे तिकीट बुकिंग होणार पाचपट वेगाने!

२,२०० वर गाड्यांसाठी नवीन ॲडव्हान्स रिझर्व्हेशन सिस्टीम; तत्काळ तिकिटांमधील गैरप्रकार थांबणार
Faster Train Ticket Booking |
Faster Train Ticket Booking | रेल्‍वे तिकीट बुकिंग होणार पाचपट वेगाने!File Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : भारतीय रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीत (पीआरएस) मोठा बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना आता तिकीट बुकिंगदरम्यान पेमेंट फेल होणे, सर्व्हर क्रॅश होणे आणि चौकशीसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून सुटका मिळणार आहे. यासाठी २,२०० हून अधिक गाड्यांची संपूर्ण माहिती अपडेटेड ‘पीआरएस’ सिस्टीममध्ये ट्रान्‍स्‍फर करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग करणेही सोपे होईल. रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम सेंटरच्या (सीआरआयएस) नेक्स्ट जनरेशन ‘पीआरएस’मध्ये या सर्व एक्‍स्‍प्रेस आणि मेल गाड्यांचा डेटा ट्रान्‍स्फ‍र केला गेला असून, यामुळे ‘आयआरसीटीसी’ वेबसाईट व बुकिंग काऊंटरवरील तिकीट बुकिंग पाचपटीने वेगवान होणार आहे.

भारतीय रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) २०१० पासून जुन्या सर्व्हर आणि ओपन ‘व्हीएमएस’ प्लॅटफॉर्मवर काम करत होती. ही आरक्षण प्रणाली तिकिटांची वाढती मागणी आणि सणासुदीच्या काळात साईटवर वाढणारा ताण सांभाळताना अनेकदा मंदावते. यामुळे तत्काळ बुकिंगमध्ये ताण वाढतो. आता नवीन आरक्षण प्रणाली मायक्रो सर्व्हिसआधारित क्लाऊड नेटिव्ह प्लॅटफॉर्मवर काम करेल, जी वाढत्या ताणानुसार स्वतःची क्षमता वाढवू शकते.

नवीन ‘पीआरएस’ सिस्टीमची वैशिष्ट्ये

‘आयआरसीटीसी’वर दर मिनिटाला १.५ लाखाहून अधिक तिकिटे बुक होतात. जुन्‍या ‘पीआरएस’ सिस्टीमवर एका मिनिटात फक्त ३२ हजार तिकिटे बुक होत. नव्‍या यंत्रणेत एका मिनिटात दीड लाखाहून अधिक तिकिटे बुक होतील. यामुळे बुकिंगचा ताण कमी होईल. तसेच, सामान्य प्रवासीही आणीबाणीच्या प्रसंगी त्‍वरित तत्काळ तिकीट बुक करू शकतील. सध्या बऱ्याचदा मोबाईलवरून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी खूप वेळ लागतो.

* रेल्वेची चौकशी सोपी होणार.

* नवीन क्लाऊड सिस्टीम १० पट अधिक म्‍हणजे दर मिनिटाला ४० लाखांहून अधिक लाईव्ह चौकशीची प्रक्रिया करू शकते.

* जुन्या सिस्टीमची क्षमता अवघी ४ लाख होती.

* आरक्षण प्रणाली अपग्रेड झाल्‍याने प्रवाशांना पसंतीची सीट निवडता येईल.

* वेबसाईटवर स्वस्त भाड्याच्या दिवसांची यादीही दाखवली जाईल. प्रवाशांना कमी रेल्वे भाड्यात प्रवास करता येईल.

* आधार-ओटीपी व्हेरिफिकेशनदेखील मजबूत केले गेले आहे.

* दलाल-स्वयंचलित पद्धतीने (बॉटस्‌द्वारे) तिकिटे बुक करणारे ब्लॉक केले जातील.

* ‘आयआरसीटीसी’ची नवीन वेबसाईट बुकिंग प्रक्रियाही कमी वेळेत पूर्ण करते आणि सामान्य व्‍यक्‍तीलाही तिकीट सहज बुक करता येते.

* देशात संगणकीकृत रेल्वे आरक्षण १९८६ मध्ये सुरू झाले.

* ऑनलाईन तिकीट बुकिंग २००२ मध्ये सुरू झाले.

* आज २४ वर्षांनंतर ९० टक्के तिकिटे ऑनलाईन बुकिंगद्वारे बुक होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.