Radhakrishna Vikhe Patil: पाणीवाटपात कोणावरही अन्याय होणार नाही, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करा; जलसंपदामंत्र्यांच्या सूचना

बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाण्याचा पुनर्वापर आणि समान पाणीवाटपाला प्राधान्य देण्याच्या जलसंपदामंत्र्यांच्या सूचना
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पाणीवाटपात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पाणी वितरणाचे योग्य नियोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

बंधार्‍यांच्या दुरुस्तीची कामे, पाण्याचा पुनर्वापर, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि सर्व लाभधारकांना समान संधीने पाणी उपलब्ध करून देणे, या बाबींना प्राधान्य देऊन संबंधित विभागाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Pune Water Planning: पिण्याचे आणि शेतीच्या पाणी नियोजनासाठी समन्वयाने काम करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना

पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाणी नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत उपस्थित आमदार आणि लोकप्रतिनिधींनी विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Radhakrishna Vikhe Patil
New Cyclone Threat | ‘अर्णब’पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचा धोका

बैठकीला उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचेआयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच जिल्हा परिषद, कृषी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.