दसऱ्याच्या मुहूर्तावर ७ हजार वाहनांची खरेदी ; सर्वाधिक दुचाकींची नोंद

202 ई-वाहने येणार दारात
Purchase vehicles on the occasion of Dussehra
वाहनांची खरेदीpudhari
Published on
Updated on

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा तब्बल 7 हजार 404 वाहनांची खरेदी केली आहे. यात सर्वाधिक 4 हजार 957 दुचाकी, तर 1 हजार 796 चारचाकींची खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहने खरेदीला चांगला प्रतिसाद असून, तब्बल 202 इलेक्ट्रिक दुचाकींची रस्त्यावर भर पडणार आहे.

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पुणेकर वाहन खरेदीला नेहमीच मोठी पसंती देतात. विजयादशमीला पूजा करून अनेकांनी वाहने घरी नेण्याची जय्यत तयारी केली आहे.

काहींनी शोरूममध्ये आपल्या आवडीच्या वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. वाहन नोंदणी वेळेत व्हावी, याकरिता पुणे आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी गतीने काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

174 दुचाकी, 12 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

यंदा दसर्‍याच्या मुहूर्तावर पुण्यात 202 ई-वाहनांची खरेदी झाली. यामध्ये 174 दुचाकी, 12 कार, 11 गुड्स वाहने, 5 रिक्षा या वाहनांचा समावेश आहे, अशी नोंद पुणे आरटीओ कार्यालयाने केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news