Custard Apple Price: अबब! पुरंदरची सीताफळे 251 रुपये किलो

सीताफळासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा पंधरा दिवस अगोदरच हंगाम सुरू झाला आहे.
Purandar News
अबब! पुरंदरची सीताफळे 251 रुपये किलोPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: सीताफळासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा पंधरा दिवस अगोदरच हंगाम सुरू झाला आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात सीताफळे दिसू लागली आहेत. पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथून 21 किलो सीताफळांची आवक झाली. घाऊक बाजारात त्याच्या किलोला 251 रुपये भाव मिळाला.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांच्या जय शारदा गजानन या गाळ्यावर ही आवक झाली. काळेवाडी येथील शेतकरी दादा काळे यांच्या शेतातून ही सीताफळे बाजारात दाखल झाली. त्याची सुबोध झेंडे यांनी खरेदी केली. (Latest Pune News)

Purandar News
Vaishnavi Hagawane: शशांक हगवणे यांचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर नागरिक आवर्जून सीताफळांची वाट पाहात असतात. हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यासह अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यातून आवक होत असते. सध्या दाखल झालेल्या सीताफळाला घरगुती ग्राहकांकडून मागणी आहे.

मात्र, अलीकडच्या काळात ज्यूस विक्रेते, पल्पसह विविध प्रक्रिया उद्योगांकडून मागणी वाढली आहे. आवक वाढून भाव कमी झाल्यानंतर त्यांच्याकडून खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सीताफळांचे व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

Purandar News
Malegaon Sugar Factory: विरोधकांशी युती का लढत? राष्ट्रवादी करणार का आज फैसला?

यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने उत्पन्न चांगले होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. सीताफळाचे तीन बहर असतात. त्यापैकी पहिल्या बहराची ही आवक आहे. हळूहळू आवक वाढणार आहे. सीताफळासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने तीनही बहरात चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

- दादा काळे, शेतकरी, काळेवाडी, पुरंदर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news