Purandar Airport: पुरंदर विमानतळप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार

बाधित शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली
Purandar Airport
बाधित शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतलीPudhari
Published on
Updated on

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनावरून निर्माण झालेला प्रश्न अजूनही कायम आहे. यासंदर्भात बाधित शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील साखर संकुल येथे झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीही उपस्थित होते. (Pune Latest News)

या प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव मेमाणे आणि खानवडी या गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. एकूण 13 हजार 300 खातेदारांपैकी 2 हजार 471 खातेदारांनी हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींवर जिल्हा प्रशासनाने जून महिन्यात सुनावणी घेतली होती. दरम्यान काही शेतकर्‍यांनी स्वेच्छेने जमिनी देण्याची तयारी असल्याचेही प्रशासनाला कळविले आहे.

Purandar Airport
Pune Crime : पळताना ठेच लागून पडला, पोलिसांच्या तावडीत सापडला; लॅपटॅप चोर पोहोचला तुरूंगात

शनिवारी झालेल्या बैठकीत साधारण 25 ते 30 शेतकरी पवारांना भेटले. त्यांनी सरकारकडून देऊ केलेला मोबदला अपुरा असल्याचे सांगून त्यात वाढ करण्याची मागणी केली. तसेच केवळ आर्थिक मोबदला नव्हे, तर बाधित शेतकर्‍यांच्या पुनर्वसनाची हमी व स्पष्ट धोरण जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही शेतकर्‍यांनी केली. सरकारने एरोसिटीमध्ये डेव्हलप प्लॉट देण्याचा प्रस्ताव मांडला असला, तरी त्याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ—म आहे.

शरद पवार यांनी शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि साधारण तासभर त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी याबाबत लवकरच चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

Purandar Airport
Sharad Pawar: गांधी, नेहरूंच्या विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते; उल्हास पवारांबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

पुरंदर विमानतळ प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आता शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने या प्रश्नात रस दाखविल्याने सरकारवर तोडगा काढण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news