पुणेकर उन्हाने हैराण! पार्क, मगरपट्टा, लवळे, लोहगावचा पारा 42 अंशांवर

पुणेकर उन्हाने हैराण! पार्क, मगरपट्टा, लवळे, लोहगावचा पारा 42 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कमाल तापमानात पुन्हा मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली असून, रविवारी (दि. 5) कोरेगाव पार्क, मगरपट्टा, लवळे आणि लोहगावचा पारा 42 अंशांवर गेला होता. तर शिवाजीनगरचे तापमान 39.6 अंशांवर होते.
यंदाचा उन्हाळा पुणेकरांसाठी भयंकर उष्णतेचा ठरला असून, गेले दोन महिने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
मे महिन्यातील पहिला रविवारदेखील कुलर समोर घालवावा लागला, इतका भयंकर उष्मा शहरात जाणवत होता. सकाळपासूनच शहराच्या सर्वच भागातील रहदारी कमी झाली होती. दुपारी 1 ते 4 या वेळेत बहुतांश भागातील वर्दळ थांबलेली दिसली.

पुण्याचा उकाडा सोशल मीडियावर

राज्यात सर्वंत्र उकाडा आहे. मात्र, सोशल मीडियावर पुणे शहरातील उकाडा हा चर्चेचा विषय बनला आहे. 'पुणे तेथे काय ऊन-ए' हा मेसेज सर्वत्र चर्चेत आहे.

मान्सून नाही आला हो…

रविवारी एका वृत्तवाहिनीने मान्सून थेट केरळात दाखल झाल्याचे वृत्त प्रसारित केले. त्यावर आयएमडी पुणेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी मान्सून अद्याप आलेला नसून, हे वृत्त माझ्या नावाने चुकीचे प्रसारित केल्याचा खुलासा प्रसारमाध्यमांना कळवला आहे.

शहराचे रविवारचे कमाल-किमान तापमान

शिवाजीनगर 39.6 (22.5), पाषाण 40 (22.3), लोहगाव 42 (24.3), चिंचवड 42 (25.8), लवळे 42 (23.3), मगरपट्टा 42(27), एनडीए 40 (21.1), कोरेगाव पार्क 42(25.5).

अवघा जिल्हाच तापला…

तळेगाव ढमढेरे 43.7, इंदापूर 42.8,
शिरूर 42.5, पुरंदर 42.1, राजगुरुनगर 41, खेड 40.8, दौंड 40.6, तळेगाव 39.4, नारायणगाव 39.2, दापोडी 39.2, हवेली 38.8

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news