जल्लोषात होणार नववर्षाचे स्वागत; हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार

दारूच्या दुकानांना रात्री 1 वाजेपर्यंत विक्रीची मुभा
New Year Party
जल्लोषात होणार नववर्षाचे स्वागत; हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार File photo
Published on
Updated on

Pune News Today: संगीताच्या तालावर ठेका धर फटकांच्या आतषबाजीत डोळ्यांत नवीन स्वप्ने घेऊन सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत होणार असून, मंगळवारी (दि. 31) रात्री आठनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात न्यू इयर पार्टीची धूम असणार आहे.

नवीन वर्षानिमित्त जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूम पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून, दारूच्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्रीची मुभा देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, रिसॉर्ट अन् विविध क्लबमध्ये रंगणार्‍या पार्ट्यांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याशिवाय विविध लज्जतदार पदार्थांची मेजवानी असणार आहे. घरोघरीही हाऊस पार्टीची तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशनला रात्री दहानंतर खर्‍या अर्थाने सुरुवात होणार आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सरत्या वर्षाला निरोप देऊन 2025 या नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात आणि जोशपूर्ण वातावरणात होणार असून, आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसह नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री ठिकठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अन् लाइव्ह म्युझिक बँडच्या तालावर थिरकत न्यू इयर पार्टी ठिकठिकाणी होणार आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आणि क्लब हाऊसमध्ये विशेष सजावट आणि विद्युतरोषणाई करण्यात आली असून, बॉलिवूड, डिस्को, डीजे अशा थीमनुसार पार्टी रंगणार आहे. पुण्यातील मॉलमध्येही नवीन वर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कॅम्प येथील महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे न्यू इअरचे सेलिब्रेशन रात्री होणार आहे.

या ठिकाणी रंगणार न्यू इयर पार्टी

डेक्कन परिसर, कोरेगाव पार्क, जंगली महाराज रस्ता, कॅम्प, विमाननगर, हिंजवडी, बाणेर, बावधन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, खराडी, विमाननगर, कोथरूड, औंध आदी ठिकाणच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, पबमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील पवनानगर, पानशेत, भूगाव, मुळशी, लोणावळा आदी ठिकाणच्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्येही विविध कार्यक्रमांनी नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. याठिकाणीही तंबू तसेच बंगलोंचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. गड-किल्ल्यांसह जिल्ह्यातील धार्मिक स्थळेही पर्यटकांनी गजबजली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news