Pune Zilla parishad : विषय समित्यांचे वाटप; दीपाली हुलावळे यांच्याकडे 'बांधकाम', तर अमोल नलावडे 'कृषी' सभापती

६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला बांधकाम सभापती पदाचा मान; उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे अर्थ व शिक्षण विभाग
Pune Zilla parishad : विषय समित्यांचे वाटप; दीपाली हुलावळे यांच्याकडे 'बांधकाम', तर अमोल नलावडे 'कृषी' सभापती
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदांचे गुरुवारी (दि. १६ एप्रिल) अधिकृतपणे वाटप करण्यात आले. यामध्ये मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशा बांधकाम व आरोग्य समितीची धुरा सोपवण्यात आली आहे, तर वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांची कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी विशेष सर्वसाधारण सभेत या निवडी जाहीर केल्या.

महत्त्वपूर्ण खातेवाटप

उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन आणि शिक्षण या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत तीन सभापतींना प्रत्येकी दोन विषय समित्यांच्या सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली. नवनिर्वाचित चार सभापतींची निवड २ एप्रिल रोजीच झाली होती, मात्र त्यांना खात्यांचे वाटप होणे बाकी होते. अखेर गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले.

Pune Zilla parishad : विषय समित्यांचे वाटप; दीपाली हुलावळे यांच्याकडे 'बांधकाम', तर अमोल नलावडे 'कृषी' सभापती
Pune ZP | चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन; जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई

दीपाली हुलावळे यांनी रचला इतिहास

जिल्हा परिषदेच्या ६४ वर्षांच्या इतिहासात यंदा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. १९६२ मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आजतागायत एकाही महिला सदस्याला बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी संधी मिळाली नव्हती. खडककाळे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या दीपाली हुलावळे यांना ही संधी देऊन जिल्हा परिषद प्रशासनाने महिलांना मोठे प्रतिनिधित्व दिले आहे. बांधकाम सभापती होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

अशी आहे नवी टीम

  • विवेक वळसे-पाटील (उपाध्यक्ष): अर्थ, नियोजन आणि शिक्षण विभाग.

  • दीपाली हुलावळे: बांधकाम आणि आरोग्य समिती.

  • अमोल नलावडे: कृषी आणि पशुसंवर्धन समिती.

  • अंकिता पाटील-ठाकरे: महिला व बालकल्याण समिती (पूर्वीच निवड).

  • जितेंद्र बडेकर: समाजकल्याण समिती (पूर्वीच निवड).

Pune Zilla parishad : विषय समित्यांचे वाटप; दीपाली हुलावळे यांच्याकडे 'बांधकाम', तर अमोल नलावडे 'कृषी' सभापती
Pune Illegal Construction Action: लोहगाव-खराडीतील अनधिकृत बांधकामांवर मनपाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. गुरुवारपर्यंत उपाध्यक्ष व अन्य दोन पदाधिकारी बिनखात्याचे सभापती म्हणून कार्यरत होते.

या विशेष सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या कामकाजाला आता अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news