

Pune ZP chairperson reserved
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वेळेस हे पद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाले होते. राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांच्या आरक्षणाचे प्रवर्ग जाहीर करण्यात आले आहेत. राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सहसचिव व.मु. भरोसे यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
या अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वेळेस हे पद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाले होते.
* १ जागा अनुसूचित जमातीसाठी
* १ जागा अनुसूचित जमाती (महिला) साठी
* २ जागा मागास प्रवर्गासाठी
* २ जागा मागास प्रवर्ग (महिला) साठी
* ३ जागा सर्वसाधारण गटासाठी
* ४ जागा सर्वसाधारण (महिला) साठी राखीव असणार आहे.
गेल्या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी घोषित झाले होते. यंदा मात्र ते सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्याने आहे.